कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात टेस्ट, ट्रॅक, ट्रीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:16+5:302021-06-27T04:22:16+5:30
बीड : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रेट हा ६.५४ टक्के आहे. जिल्ह्यातील ९.५८ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर ...

कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात टेस्ट, ट्रॅक, ट्रीट
बीड : आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आरटीपीसीआर पॉझिटिव्ह रेट हा ६.५४ टक्के आहे. जिल्ह्यातील ९.५८ टक्के रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. त्यामुळे शासन नियमानुसार बीड जिल्ह्याचा समावेश हा तिसऱ्या स्तरात झाला आहे. म्हणून जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार आरटीपीसीआर टेस्टदेखील वाढविण्यात येणार आहेत. तर, सायंकाळी पाच वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात विनाकारण घराबाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्या संदर्भात पोलीस प्रशासनास जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.
पूर्वीच्या आदेशाप्रमाणाचे सोमवार ते शुक्रवार या काळात सर्व दुकाने ही चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. तसेच आरोग्य विभागाकडून ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. त्याचसोबत उपचाराच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात. तपासणी वाढवावी, गर्दी होणार नाही या दृष्टीने सर्व मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक, ठाणेप्रमुखांनी परवानगीसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा. त्याचसोबत रुग्णसंख्या वाढत असेल तर त्या परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करून निर्बंध लागू करावेत. कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल तर प्रशासनाकडून कारवाई करण्यात यावी, असे आदेशदेखील जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत.
--------
व्यावसायिकांची कोरोना चाचणी
पाटोदा येथे नगरपंचायत व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरातील दुकानांवर जाऊन कोरोना चाचणीबाबत तोंडी सूचना दिल्या; तर इतर ठिकाणीही कोरोना चाचणी करून रुग्ण शाेधण्याचे उपाय सुरू झाले आहेत. चाचणीपेक्षा लसीकरणच करून घ्यावे, अशी मागणी व्यापारी, विक्रेत्यांमधून होत आहे.