अंबाजोगाई : बीड येथून लातूरकडे तर लातूर येथून बीडकडे जाणाऱ्या जीप व कारचा समोरासमोर अपघात होऊन तिघेजण जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघातातील तीनही मयत लातूरचे आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांची ओळख पटलेली नव्हती. हा अपघात सोमवारी रात्री १०:३० वाजता तालुक्यातील बर्दापूर फाट्याच्या पुढे असलेल्या वळणाजवळ घडला.
ही जीप (एम.एच.२४ व्ही ४७७१) बीडकडून लातूरकडे जात होती, तर कार (एम.एच.१२ सी.वाय.७०२२) लातूरहून बीडकडे जात होती. या दोन्ही वाहनांची जोरदार धडक होऊन अपघातात कारमधील तीन युवक जागीच ठार झाले, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातस्थळी मोठी गर्दी जमली होती. जखमींना लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे बर्दापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी सांगितले.
Web Summary : A head-on collision between a jeep and a car on the Ambejogai-Latur road resulted in three fatalities from Latur. The accident occurred near Bardapur Phata around 10:30 PM. Two others were seriously injured and hospitalized in Latur.
Web Summary : अंबाजोगाई-लातूर मार्ग पर जीप और कार की आमने-सामने टक्कर में लातूर के तीन लोगों की मौके पर ही मौत हो गई। बर्दापुर फाटा के पास रात करीब 10:30 बजे यह दुर्घटना हुई। दो अन्य गंभीर रूप से घायल हुए और उन्हें लातूर के अस्पताल में भर्ती कराया गया।