दहा हजारांचा खिसा कापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST2021-06-10T04:23:13+5:302021-06-10T04:23:13+5:30

... अंभोरा रस्ता दुरुस्तीची मागणी धानोरा : आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा ते अंभोरादरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा ...

Ten thousand pocket cut | दहा हजारांचा खिसा कापला

दहा हजारांचा खिसा कापला

...

अंभोरा रस्ता दुरुस्तीची मागणी

धानोरा : आष्टी तालुक्यातील अंभोरा फाटा ते अंभोरादरम्यान रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. याचा वाहन चालकांना त्रास होत आहे. तरी या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

...

जनावरांचा बाजार सुरू करण्याची मागणी

कडा : येथे गेल्या अनेक दिवसांपासून जनावरांचा बाजार बंद आहे. याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे, तरी जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

...

खंडित वीजपुरवठा

धानोरा : परिसरातील हिवरा, पिंपरखेड, साबलखेड, भोजेवाडी गावांना धानोरा येथील वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो, परंतु ऐन सुगीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. गेल्या आठवड्यापासून वादळी पावसात अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा नागरिकांना त्रास झाला, तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी होत आहे.

...

Web Title: Ten thousand pocket cut