केज येथे अल्पवयीन मुलीचा खून करून युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 12:12 IST2018-03-10T12:11:30+5:302018-03-10T12:12:58+5:30

केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एका अल्पवयीन मुलीचा खून करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

A teenager boy committed suicide by killing minor girl | केज येथे अल्पवयीन मुलीचा खून करून युवकाची आत्महत्या

केज येथे अल्पवयीन मुलीचा खून करून युवकाची आत्महत्या

बीड : केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एका अल्पवयीन मुलीचा खून करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हा प्रकार  प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुनिता दिगंबर चटप आणि गणेश थोरात अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुनिता ही दहावीला शिकत होती. गणेशने सुनिताच्या वडीलांना तिच्या सोबत लग्न करण्यासंदर्भात चार पाच वेळा विचारणा केली होती. मात्र त्यांनी नकार कळवला होता. काही दिवसांपूर्वीच सुनिताला लग्नासाठी स्थळ आल्याचे गणेशच्या कानावर आले होते. तेव्हापासून गणेश अस्वस्थ होता. 

चटप आणि थोरात कुटुंबीयांचे एकमेकाच्या घरी जाणे येणे होते. दरम्यान शुक्रवारी रात्री गणेशच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता. भजनास सुनिताचे आई-वडील आले होते. यामुळे घरी सुनिता आणि तिचा अपंग भाऊ असे दोघेच होते. ही संधी साधून रात्री साडे अकराच्या सुमारास गणेश हा सुनिताच्या घरी गेला आणि तिला  बळजबरीने काही अंतरावरील शेतात घेऊन गेला. यानंतर त्याने सुनीताचा गळा दाबून खून केला व स्वत:ही काही अंतरावरील  झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: A teenager boy committed suicide by killing minor girl