शिक्षकाची आत्महत्या; फरार आरोपी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:58 IST2019-11-22T23:58:15+5:302019-11-22T23:58:44+5:30
तालुक्यातील धनगरवाडी परिसरामध्ये कमलाकर अभिमान खंदारे या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती.

शिक्षकाची आत्महत्या; फरार आरोपी पकडला
बीड : तालुक्यातील धनगरवाडी परिसरामध्ये कमलाकर अभिमान खंदारे या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल दहा जणांवर गुन्हा दाखल होता. मात्र, यातील सर्व आरोपी फरार होते. यातील मुख्य आरोपीस गारखेडा वस्ती येथून गुरूवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली.
सुभाष मनोहर घुगे (वय ४८, रा. बोरफडी, ता. बीड) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. त्याने मयत शिक्षक कमलाकर खंदारे यांना शिवाजीनगर ठाण्यामध्ये दाखल असलेला गुन्हा परत घे नाहीतर तुझ्यावरही अत्याचाराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली होती. या तणावातून खंदारे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी घुगेसह अन्य १० जणांवर ग्रामीणठाण्यात ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. तेव्हापासून सर्व आरोपी फरार आहेत. गुरुवारी घुगे यास अटक करण्यात आली.
ही कारवाई सपोनि.सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे, पोशि. बाळकृष्ण म्हेत्रे, तानाजी डोईफोडे यांनी केली.