तहसीलच्या आवारातच तलाठ्याने घेतली ५० हजारांची लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 16:02 IST2021-01-09T16:02:00+5:302021-01-09T16:02:25+5:30

केज मध्ये 50 हजाराची लाच स्वीकारताना तलाठी चतुर्भुज

Talathi took a bribe of Rs 50,000 in the premises of the tehsil | तहसीलच्या आवारातच तलाठ्याने घेतली ५० हजारांची लाच

तहसीलच्या आवारातच तलाठ्याने घेतली ५० हजारांची लाच

ठळक मुद्देपाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल १ लाख रूपयांची लाच मागितली होती.

केज : तब्बल ५० हजारांची लाच घेणाऱ्या लाचखोर तलाठ्यासह सहाय्यकास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे.

दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहाय्यकाचे नाव आहे. सहाय्यकाच्या माध्यमातून तक्रारदाराकडून पाझर तलावात संपादित जमिनीसंबधीत क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल १ लाख रूपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती सहाय्यकाकडून ५० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या   पथकाने रंगेहाथ पकडले. दोघा लाचखोराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Talathi took a bribe of Rs 50,000 in the premises of the tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.