हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:10 IST2019-04-05T00:09:29+5:302019-04-05T00:10:12+5:30
लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे.

हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाने घेतला गळफास
कडा : लग्न अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपले असताना अचानक नवरदेवाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबासाहेब पांडुरंग औटे (२८) असे मयत तरु णाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील नांदा येथील पांडुरंग औटे याचा मुलगा बाबासाहेब अहमदनगर येथे एका पोल्ट्री फार्मवर सुपरवायझर म्हणून तो काम करीत होता. गुरु वारी सकाळी गावापासून चार किमी अंतरावर असलेल्या फत्तेवडगाव ते घुमरीपिंपरी रोडवरील कानडी शिवारात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन साडेदहा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत बाबासाहेब औटेचा विवाह २६ एप्रिल रोजी होणार होते मात्र, हळद लागण्यापूर्वीच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.
कडा पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद आष्टी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजले नाही.