‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरासाठी स्वाराती रुग्णालयाची रक्तपेढी अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:07+5:302021-07-24T04:20:07+5:30
अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, वडवणी, शिरसाळा येथेही घेतले कॅम्प अंबाजोगाई : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा ...

‘लोकमत’च्या रक्तदान शिबिरासाठी स्वाराती रुग्णालयाची रक्तपेढी अग्रेसर
अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, वडवणी, शिरसाळा येथेही घेतले कॅम्प
अंबाजोगाई : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा ऊर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने बीड जिल्ह्यात सर्वत्र रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. २ जुलै ते १९ जुलै या कालावधीत आयोजित रक्तदान शिबिरे अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या माध्यमातून घेण्यात आली. अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, वडवणी, शिरसाळा या ठिकाणी झालेल्या उत्स्फूर्त रक्तदान शिबिरासाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तसंकलन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करून ही रक्तदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला.
स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, अधीक्षक डॉ. राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील डॉ. अरविंद बगाटे (विभागप्रमुख शरीर विकृतीशास्त्र ), डॉ. शिवाजी बिरारे (प्राध्यापक शरीर विकृतीशास्त्र), डॉ. शीला गायकवाड (प्रभारी अधिकारी रक्तकेंद्र), डॉ. सुनील स्वामी (सहयोगी प्राध्यापक), डॉ. विनय नाळपे (सहायक प्राध्यापक रक्त केंद्र), डॉ. आरती बर्गे (सहायक प्राध्यापक), डॉ. मेघा देवणे ( रक्तसंक्रमण अधिकारी), डॉ. प्रियंका गवई (रक्तसंक्रमण अधिकारी), डाॅ. केदार कुटे, डाॅ. दत्ता चिकटकर, डाॅ. संपदा, महानंदा सरवदे, शशिकांत पारखे, सरोज गालफाडे, जगदीश रामदासी, किरण चव्हाण, अन्वर मेहबूब शेख, वाल्मीक कांबळे, अंकुश परिचर यांचे सहकार्य लाभले.