पीक कर्जास टाळाटाळ करणारा अधिकारी निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:10+5:302021-07-24T04:20:10+5:30
सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही माजलगाव तालुक्यातील काही गावांना दत्तक बँक आहे. तसेच परळी तालुक्यातील देखील काही गावांना ...

पीक कर्जास टाळाटाळ करणारा अधिकारी निलंबित करा
सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक ही माजलगाव तालुक्यातील काही गावांना दत्तक बँक आहे. तसेच परळी तालुक्यातील देखील काही गावांना दत्तक बँक आहे. माजलगाव तालुक्यातील, परळी तालुक्यातील गावांना दत्तक असणाऱ्या बँकेबाबत अनंत अडचणी निर्माण झाल्यामुळे व हक्काचे पीक कर्ज मिळत नसल्यामुळे माजलगाव, परळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते माउली जाधव यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या.
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी आणि मग्रूर, निष्ठूर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी २२ जुलै २१ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी शाखेत जाऊन याबाबत माहिती घेतली असता शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी पीक कर्ज वाटपास टोलवाटोलवी करत असून शेतकरी तारीख पे तारीख नुसत्या चकरा मारत आहेत, असे लक्षात आले. म्हणून शेतकरी कामगार पक्ष परळीच्या वतीने निवेदन देण्यात आले. सात दिवसात सुरळीत पीक कर्ज वाटप न केल्यास २९ जुलै रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक सिरसाळाच्या समोर शेतकरी कामगार पक्ष परळी यांच्या वतीने धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. यावेळी शेकाप नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील, परळी शेकापचे नेते माउली जाधव, सिद्धेश्वर नायबळ व शेकापचे कार्यकर्ते व निवेदन स्वीकारताना महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी फपाळ व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
230721\purusttam karva_img-20210723-wa0022_14.jpg