मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 20:06 IST2021-01-04T20:05:10+5:302021-01-04T20:06:11+5:30

Suspected of kidnapping a girl अंबाजोगाई शहरातील १९ वर्षीय मुलगी २१ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली आहे.

Suspected of kidnapping a girl; The young man's father was beaten in the field | मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण 

मुलीला पळवून नेल्याचा संशय; तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून मारहाण 

ठळक मुद्दे २८ डिसेंबर २०२० रोजी रात्री आठ वाजता त्या तरुणाच्या वडिलांना नगरपालिका परिसरातून उचलले. चे डोळे बांधून कारमधून नेऊन एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये डांबले.

अंबाजोगाई (जि. बीड) : आठ दिवसांपूर्वी अंबाजोगाईतून बेपत्ता झालेल्या मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून एका तरुणाच्या वडिलांना शेतात डांबून बेदम मारहाण केल्याच्या आरोपावरून मुलीच्या वडिलांसह सहाजणांवर गुन्हा नोंद झाला.

अंबाजोगाई शहरातील १९ वर्षीय मुलगी २१ डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, या मुलीला अंबाजोगाई शहरालगतच्या एका गावातील तरुणाने पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांना होता. त्यावरून त्यांनी अन्य पाचजणांच्या मदतीने २८ डिसेंबर २०२० रोजी रात्री आठ वाजता त्या तरुणाच्या वडिलांना नगरपालिका परिसरातून उचलले. त्यांचे डोळे बांधून कारमधून नेऊन एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये डांबले.

तिथे तुझा मुलगा आमच्या मुलीस कुठे घेऊन गेला आहे, असे विचारून याला गोळ्या घाला म्हणत काठी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता त्यांना भगवानबाबा चौकात सोडून देण्यात आले, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या फिर्यादीवरून सहाजणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक गुट्टे करीत आहेत.

Web Title: Suspected of kidnapping a girl; The young man's father was beaten in the field