शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:39 IST

- फोटो बीड : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती घेण्यासाठी समाज कल्याण विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यांच्या नावनाेंदणीला सोमवारपासून ...

- फोटो

बीड : जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची माहिती घेण्यासाठी समाज कल्याण विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यांच्या नावनाेंदणीला सोमवारपासून सुरुवातही झाली आहे. शहरातील सर्वेक्षण हे समाज कल्याणचे शिक्षक तर ग्रामीणमध्ये महिला व बाल कल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका आणि आशाताई करत आहेत.

जिल्हा परिषद विभागाच्या समाज कल्याण विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करण्याची माेहीम १५ ते२८ फेब्रुवारीदरम्यान हाती घेतली आहे. यात सर्वेक्षण करून सर्वांची नावनोंदणी केली जात आहे. शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांच्यावरही सर्वेक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या दिव्यांगांची संपूर्ण माहिती ‘दिव्यांगसाथी’ या वेबसाइटवर भरण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला प्रत्येक योजनेचा लाभ देणे शक्य होणार आहे. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनांन आवाहन करून सर्वेक्षण व नावनाेंदणी करणाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.

योजनांचा लाभ मिळणार थेट

यापूर्वी दिव्यांगांना संपर्क करून कागदपत्रे जमा करण्यातच जास्त वेळ जात हाेता. परंतु आता या नोंदणीमुळे गाव, तालुक्यातील दिव्यांगांची संख्या एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे यापुढे सर्व शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांना थेट मिळणार असल्याचे डाॅ. सचिन मडावी यांनी सांगितले.