‘स्वानंदी’कडून सुरजन संगीत सभा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST2021-08-18T04:40:20+5:302021-08-18T04:40:20+5:30

: येथील स्वानंदी परिवाराकडून आयोजित सुरजन ही दुसरी मासिक संगीत सभा सोमवारी उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंगलनाथ मल्टिस्टेटचे ...

Surjan Sangeet Sabha from 'Swanandi' in excitement | ‘स्वानंदी’कडून सुरजन संगीत सभा उत्साहात

‘स्वानंदी’कडून सुरजन संगीत सभा उत्साहात

: येथील स्वानंदी परिवाराकडून आयोजित सुरजन ही दुसरी मासिक संगीत सभा सोमवारी उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंगलनाथ मल्टिस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र कानडे हे होते. संगीत सभेच्या प्रमुख कलाकार पुणे येथील गायिका स्वरेशा पोरे कुलकर्णी या होत्या.

यावेळी स्वरेशा कुलकर्णी यांनी अभंग, शास्त्रीय, उपशास्त्रीय, गझल सादर करीत उपस्थित रसिक श्रोत्यांची मने जिंकली. त्यांना प्राणेश पोरे व आकाश देशमुख यांनी संवादिनी व तबल्यावर साथसंगत केली. आकाश बियाणी यांनी सूत्रसंचालन केेले. प्राणेश पोरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वानंदीचे प्रशांत भानप, नादमयी पोरे, आकाश बियाणी, चैतन्य आहेर, निकिता शेळके, रेणुका कांकरिया, आकाश देशमुख, सागर देशमुख, समृद्धी देशमुख यांनी परिश्रम घेतले.

170821\purusttam karva_img-20210817-wa0025_14.jpg

Web Title: Surjan Sangeet Sabha from 'Swanandi' in excitement