ताडसोन्ना आरोग्य केंद्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:34 AM2021-07-31T04:34:38+5:302021-07-31T04:34:38+5:30

जिल्ह्यात सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा आणि उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे नॉनकाेविड रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष ...

Surgery for the first time since the second wave of corona at Tadsonna Health Center | ताडसोन्ना आरोग्य केंद्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच शस्त्रक्रिया

ताडसोन्ना आरोग्य केंद्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच शस्त्रक्रिया

Next

जिल्ह्यात सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा आणि उपचार मिळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे नॉनकाेविड रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियांकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता आरोग्य विभागाने या सर्व सुविधांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. अगोदर शहरांतील शासकीय रुग्णालयांमध्ये आणि आता ग्रामीणमधील आरोग्य केंद्रामध्येही शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. मोहखेडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर शुक्रवारी सकाळी ताडसाेन्ना आरोग्य केंद्रात दहा महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (बिनटाका) करण्यात आली. या सर्व महिलांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीतम लोध, डॉ. अजय जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

--

ताडसोन्ना आरोग्य केंद्रात सामान्यांना रुग्णसेवा तत्पर व दर्जेदार मिळावी, यासाठी कायम सूचना केल्या जातात. शुक्रवारी येथे १० महिलांची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. यापुढेही सेवा देण्यासाठी आमचे पथक तत्पर राहील, याची काळजी घेऊ.

डॉ.नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी, बीड.

300721\30_2_bed_12_30072021_14.jpeg

ताडसोन्ना आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया पार पाडणारे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट व त्यांची टीम दिसत आहे.

Web Title: Surgery for the first time since the second wave of corona at Tadsonna Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.