शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आगामी पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ द्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:04 AM

गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसारग यांचे प्रतिपादन । मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंझेरी फाटा ते कर्झणी रस्त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

बीड : तुमचं आमचं विकासाचं नातं रक्तापेक्षा मजबूत आहे. समोरच्या माणसाची उंची किती आहे, त्यांनी कोणती कामे केली हे तपासले पाहिजे. सर्वांना सोबत घेवून भेडसावणारे प्रश्न कोण सोडवितो हे पाहिले पाहिजे. गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. आता चिन्ह बदलले असून प्रत्येक घरोघरी जावून धनुष्यबाणाचे चिन्ह समजावून सांगावे. मी आता शिवधनुष्य हाती घेतले आहे, सर्वांनी सहकार्य करून ताकत द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंझेरी फाटा ते कर्झणी रस्त्याचे उद्घाटन जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, नितीन धांडे, राणा डोईफोडे, गोरख शिंगण, रतन गुजर हे उपस्थित होते.क्षीरसागर म्हणाले की, या भागात नॅशनल हायवे २११ ते कर्झणी या रस्त्याचे उद्घाटन झाले असून त्याचे काम लवकरच सुरू होऊन वाहतूक सुरळीत होईल. रस्त्याच्या जोडणीबरोबरच मतांची जोडणी करावयाची आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडले असून कर्झणीच्या तलावात तीस ते चाळीस टक्के पाणी आहे. येथे अनेक विकासाची कामे झाली असून या पुढेही गावाला कोठेही कमी पडू दिले जाणार नाही. आतापर्यत सुविधा आणि गरजा पूर्ण करण्याचे काम केले. रेशनकार्ड, गॅस कनेक्शन आदी योजना राबवून श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन आता सहाशे ऐवजी एक हजार रुपए एवढे वाढविले असून जे घटक परिघाबाहेर आहेत त्यांचा कसा फायदा होईल यासाठी सरकारच्या माध्यमातून काम करीत आहोत. कोणी कोठेही असले तरी ते मनाने आपल्याबरोबर आहेत. मंत्रीपदाचा आणि संधीचा वापर विकासासाठी केला. मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून समुद्राला वाहून जाणारे ६०० टि.एम.सी पाणी मराठवाड्यात वळविल्यानंतर येथील जनता कधीही विसणार नाही. ३० हजार कोटींच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे ते म्हणाले.कुंडलिक खांडे म्हणाले, क्षीरसागर यांची ताकत जिह्यातच नव्हे तर राज्यातही आहे. कर्झणीकरांनी एकमुखी मतदान केले पाहिजे. त्यांना राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी मिळून ताकत उभी करावी. ही निवडणूक स्वत:ची समजून जोमाने कामाला लागावे असे ते म्हणाले.सचिन मुळूक, राणा डोईफोडे, गोरख शिंगण यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, अरूण बोंगाणे, सर्जेराव शिंदे, शुभम कातांगळे, सर्जेराव खटाणे, शिवानंद कदम, सदाशिव सुर्वे, देवीदास डांगे, मंदाबाई खटाणे, शहादेव डांगे, विठ्ठल साबळे, राजाभाऊ खुरणे, पठाण अहमद, अन्साराम मोरे, सुनील साबळे, दिलीप डोळे यांच्यासह महिला, पुरूष, युवकांची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना