शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

विकास, परिवर्तनासाठी साथ द्या- क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:20 AM

विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभेच्या निवडणुकीत ढेकनमोहा परिसर मोठ्या ताकतीने युतीच्या मागे उभा राहिला होता. आता विधानसभेला ही तितक्याच ताकदीने उभे रहा. परिवर्तनासाठी ताकतीने साथ द्या पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर विकास कामे करणे गरजेची आहेत. आता बाण हातात आहे, घड्याळ बंद पडले आहे, असे सांगून विरोधकांनी दुसऱ्याच्या उट्ट्या काढत बसू नयेत, विकासाची कामे करून दाखवावीत, असे आवाहन राज्याचे रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ते कामांच्या आणि गोरक्षनाथ टेकडी येथील रस्ते सुधारणा कामांच्या एकूण चार कोटी १७ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आज झाला. बीड तालुक्यातील गोरक्षनाथ टेकडी, ढेकणमोहा येथे झालेल्या या भूमिपूजन समारंभास गोरक्षनाथ टेकडी देवस्थानचे ह.भ.प. नवनाथ महाराज, नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सचिन मुळक, जगदीश काळे, अरूण डाके, विलास बडगे, दिलीप गोरे, दिनकर कदम, गणपत डोईफोडे उपस्थित होते.भूमीपूजनांनंतर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आम्ही बिघडलेले घड्याळ काढून धनुष्य हाती घेतले आहे, स्व बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि माझे सहकारी माझ्याबरोबर समर्थपणे साथीला आहेत त्यामुळेच लोकसभा निवडणुकित युतीला चांगले मतदान ढेकनमोहा परिसरातून मिळाले त्यापेक्षाही अधिक मतदान आता विधानसभेला मिळणार आहे, असा मला ठाम विश्वास आहे. पुढच्या पिढीसाठी विकास कामे महत्वाची आहेत, दिलेला शब्द आज पूर्ण करतोय.गोरक्षनाथ टेकडीच्या रस्त्यासाठी ४० लाखांचा निधी टाकला आहे, पुढचा टप्पा पूर्ण रस्ते करून घेण्यासाठी राहील, योजना आणण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत, युतीचे सरकार जनतेच्या भल्याचे सरकार आहे हे ओळखून घ्या, बीड-गेवराई मार्गाच्या जमिनीचा मावेजा जसा मिळवून दिला तसा बीड ते परळी मार्गाचा मावेजा देखील मिळवून देऊत, आम्ही घोषणा करत नाहीत तर त्या पूर्णच करतो.दुष्काळी मराठवाडा पाण्याच्या प्रश्नाने चिंतेत आहे ही चिंता मिटवण्यासाठी मोठा आराखडा तयार करण्यात आला आहे, डीपीआरचे काम अंतिम टप्यात आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या विनाअट मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत, मागेल त्याला शेततळे दिले जाईल, असेही क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.रोहयोमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ढेकणमोहा -कराळवाडी- निर्मळवाडी या ६.९० किलोमीटर लांबीच्या व ३ कोटी ९९ लक्ष रु पयांच्या कामाचे भूमिपूजन करून आश्वासन पाळले.तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे १८ लक्ष रु पये खर्चाच्या बीड परळी मार्ग ते गोरक्षनाथ टेकडी रस्ता सुधारणा कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

टॅग्स :Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक