पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:50 IST2019-03-12T00:50:37+5:302019-03-12T00:50:50+5:30
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी केज तालुक्यातील होळ येथे उघडकीस आली.
सचिन मारूती शिंदे (वय २५ रा. होळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मागील तीन वर्षापासून सचिन पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याने होळ शिवारातील श्रीकांत फुगारे यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. सचिनच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, युसूफवडगाव पोलीस तब्बल ३ तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.