वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:24 IST2021-05-31T04:24:55+5:302021-05-31T04:24:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यातील टाकळसिग येथील आष्टी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल आबासाहेब जगताप (वय ३१) ...

वनरक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील टाकळसिग येथील आष्टी वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले अनिल आबासाहेब जगताप (वय ३१) यांनी गळ्यातील गमज्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुंगगावरोडवरील डोंगरातील श्रृंगेरीदेवी मंदिराजवळ घडली.
आत्महत्येची घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आष्टी तालुक्यातील श्रुंगेरीदेवी डोंगर व ब्रह्मगाव कार्यक्षेत्रात वनरक्षक म्हणून अनिल जगताप हे आपल्या कर्तव्यावर गेले होते. मात्र त्यांचा संपर्क न झाल्याने त्यांची शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मुगगावरोडवरील वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केली? आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संतोष क्षीरसागर हे करीत आहेत. आत्महत्या का केली? यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
.....