प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:37 IST2021-05-20T04:37:00+5:302021-05-20T04:37:00+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

Suicide by hanging of a loving couple | प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेमी युगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

अंबाजोगाई : तालुक्यातील राजेवाडी येथील २४ वर्षीय तरुण आणि १८ वर्षीय तरुणीने झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अनिता शेषेराव राठोड आणि प्रवीण सुधाकर काचगुंडे अशी त्या दोघा मृतांची नावे आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिता आणि प्रवीण हे दोघेही बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आपापल्या घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी सकाळी अंदाजे ११ वाजण्याच्या आसपास राजेवाडी शिवारातील गायरानाच्या उतारावरील लिंबाच्या झाडाच्या एकाच फांदीला एकाच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दुपारी ४ च्या सुमारास काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत, उपनिरीक्षक केंद्रे, बीट अंमलदार गुट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान, प्रेमप्रकरणाला होत असलेल्या विरोधामुळे या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Web Title: Suicide by hanging of a loving couple