सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:02 IST2019-08-01T00:01:51+5:302019-08-01T00:02:26+5:30
‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते.

सरसकट कर्जमाफीसाठी ‘प्रहार’ संघटनेचा मोर्चा
बीड : जिल्ह्यातील सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यांना शासनाने दिलेल्या कर्जमाफीने दिलासा मिळणार नाही म्हणून सरकट कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतर मागण्यासाठी ‘प्रहार’ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शेकडो कार्यकर्ते व शेतकरीमोर्चात सहभागी झाले होते.
प्रहार जनशक्ती पक्ष बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला, यावेळी शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, पिकविमा पक्कम तातडीने वाटप करावी, शोतीच्या पेरणी ते कापणी पर्यंत समावेश मनरेगा योजनेत करावा, दुष्काळग्रस्त भागात अजूनही अनुदान शेतकºयांना मिळालेले नाही त्यांना ते तात्काळ वाटप करावे, दुष्काळी परिस्थिमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृह निर्माण करावे, विधवा भगिनींना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेट द्यावी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायतसमिती या सर्वांनी दिव्यांगाच्या ५ ट्क्के निधी त्वरित वाटप करावा यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्षा लताताई सीताराम पंडित, सुनील ठोसर, भगवानराजे कदम, श्रीकृष्ण कचरे, गणेश शेळके, कैलास मस्के, सीतारामजी पंडित, सुरेश नवले, यशवंत टकले, मंगल आगलावे, सोनाली काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केलेला होता.