कड्यात कोरोनाच्या नियमावलीला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:10+5:302021-05-24T04:32:10+5:30

कडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा याकरिता प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना राबवित आहे. असे असताना मात्र कड्यात शासन ...

Strike the corona rules in the ring | कड्यात कोरोनाच्या नियमावलीला हरताळ

कड्यात कोरोनाच्या नियमावलीला हरताळ

कडा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात यावा याकरिता प्रशासन सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना राबवित आहे. असे असताना मात्र कड्यात शासन नियमावलीला सर्रास हरताळ फासला जात आहे. टाळेबंदीत अत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त काही व्यावसायिकांनी दुकाने उघडून अक्षरश: बाजार थाटला आहे.

आष्टी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांचा आकडा देखील बेशिस्त नागरिकांच्या वर्तनामुळे कमी होताना दिसत नाही. आष्टीसह कड्यातही ठिकठिकाणी कोरोना नियमावलीची राजरोसपणे पायमल्ली करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सर्वतोपरी प्रतिबंधक उपाययोजना करीत आहेत. मात्र, नागरिकांसह काही मुजोर व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कड्यात तर टाळेबंदी असूनही अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त अनेक दुकानदार राजरोसपणे तोंडाला मास्क न लावता दुकानाचे अर्धे शटर उघडून व्यवसाय देवाण-घेवाण करीत असल्यामुळे बाजारपेठेत सकाळपासूनच अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी होऊ लागली आहे. तरी तहसीलदारांनी गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.

Web Title: Strike the corona rules in the ring