बीड शहरात पथदिवे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:29 IST2021-02-08T04:29:51+5:302021-02-08T04:29:51+5:30

रस्ता खड्ड्यांनी व्यापला बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून, ते साचून ...

Streetlights closed in Beed city | बीड शहरात पथदिवे बंद

बीड शहरात पथदिवे बंद

रस्ता खड्ड्यांनी व्यापला

बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून, ते साचून राहत असल्याने खड्ड्यांचा आकार वाढत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत. दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे, तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. या रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नसल्याने सहा महिन्यांतच या नवीन रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. नवीन झालेल्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, तर अनेक ठिकाणचे रस्ते खचून गेले आहेत. यामुळे चालकांना वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Streetlights closed in Beed city