The street lights on the Majalgaon dam, the lamps closed on the gate | माजलगाव धरणावरील पथदिवे, गेटवरील दिवे बंद
माजलगाव धरणावरील पथदिवे, गेटवरील दिवे बंद

माजलगाव : येथील माजलगाव धरण भिंतीवरील व गेटवरील लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात सर्वत्र अंधार पसरलेला असताना येथे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शहरापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या माजलगावात धरणावरील भिंतीवर स्ट्रीट लाईट व धरणाच्या गेटवरील जवळपास सर्वच लाईट अनेक महिन्यांपासून बंद असल्याने धरण परिसरात रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. धरणावर संबंधित विभागाचे कर्मचारी व धरणाच्या सुरक्षेसाठी असलेले पोलीसांना कर्तव्य बजावताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी धरण परिसरात अनेक नागरिक ये-जा करत असतात हे ये-जा करणारे कोण व्यक्ती आहेत हे सर्वत्र अंधार असल्यामुळे येथील कर्मचाºयांना पोलिसांना जिकरीचे बनले आहे व त्यांना हे व्यक्ती जवळ येईपर्यंत ओळखता येत नसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ होत आहे.
धरणावरील लाईट सुरू असल्यास येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांना जागेवर बसून धरण परिसरात सर्व ठिकाणी लक्ष देता येते. परंतु अनेक महिन्यांपासून याठिकाणी स्ट्रीट लाइट व गेटवरील लाईट बंद असल्याने येथील कर्मचाºयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धरणावरील अनेक ठिकाणची लाईट बंद असल्याने धरण परिसरात अनेकजण अवैध धंदे करत असतात यामुळे कधीही धोका होऊ शकतो.


Web Title: The street lights on the Majalgaon dam, the lamps closed on the gate
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.