आष्टी, धामणगावला तीन तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:00+5:302021-06-27T04:22:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आमदार सुरेश धस ...

आष्टी, धामणगावला तीन तास रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आमदार सुरेश धस यांनी आष्टीत, तर माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी धामणगाव येथे तीन तास चक्काजाम आंदोलन केले.
धामणगावात अंभोरा पोलिसांनी धोंडे यांच्यासह दहा आंदोलकांना अटक करुन सुटका केली.
आरक्षणाच्या निर्णयाने ओबीसी समाज एकवटला असून, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुरेश धस यांचे आष्टीतील नगररोडवर ११ वाजता सुरुवात झाली, तर माजी आमदार भीमसेन धोंडे यांचे धामणगाव येथील बीड-कल्याण रोडवर १२ वाजता चक्काजाम आंदोलनास सुरुवात झाली. दोन्हीही आंदोलन तीन चालले.
यावेळी विजय गोल्हार, बद्रीनाथ जगताप, आदिनाथ सानप, अनिल ढोबळे, रमजान तांबोळी, यशवंत खंडागळे, सादिक कुरेशी, नवनाथ नागरगोजे, परिवंत गायकवाड, केशव बांगर, भारत मुरकुटे, बाळासाहेब घोडके, सलिम कुरेशी आदी ओबीसी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर भीमसेन धोंडे यांच्या धामणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन ते तीन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वाल्मीक निकाळजे, बबनराव झाबरे, अजय धोंडे, हनुमंत थोरवे, अमोल तरटे, शंकर देशमुख, रघुनाथ शिंदे, संतोष चव्हाण, अमोल चौधरी, अभय धोडे, अशोक साळवे, सतीश झगडे, शीतल चौधरी, सावता ससाणे, शैलजा गर्जे, सुरेखा केरुळकर, दैवशाला शिरोळे, तात्यासाहेब कदम, संदीप नागरगोजे, सुनील सूर्यवंशी, युवराज वायभासे, सुरेश दिंडे, युवराज कटके, जाकीर कुरेशी, आकील सय्यद आदी समाजबांधव उपस्थित होते.
===Photopath===
260621\img_20210626_111154_14.jpg~260621\img_20210626_131118_14.jpg