महामार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:49 IST2020-02-18T00:47:52+5:302020-02-18T00:49:08+5:30

तालुक्यातील पिंपरी येथील एक कुटुंब हे पोट भरण्यासाठी शिक्रपूर (जि.पुणे) येथे ४ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच काही लोकांनी तिच्या घरात घुसून अत्याचार करु न तिला जीवे मारल्याची धमकी दिली होती.

Stop along the highway | महामार्गावर रास्ता रोको

महामार्गावर रास्ता रोको

ठळक मुद्देमुलीवर अत्याचार प्रकरणी मातंग समाज संघटनेतर्फे आंदोलन

आष्टी : तालुक्यातील पिंपरी येथील एक कुटुंब हे पोट भरण्यासाठी शिक्रपूर (जि.पुणे) येथे ४ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच काही लोकांनी तिच्या घरात घुसून अत्याचार करु न तिला जीवे मारल्याची धमकी दिली होती. या प्रकरणी १७ रोजी मातंग समाज संघटनेच्या वतीने आष्टी-बीड महामार्गावरील अण्णा भाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात आ. सुरेश धस, आ. बाळासाहेब आजबे हे या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी संबंधित गुन्हेगारांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आ. सुरेश धस यांनी केली. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली.

Web Title: Stop along the highway