मंठ्याच्या व्यापाऱ्याचे २१ बकरे चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:28 IST2019-02-14T00:27:18+5:302019-02-14T00:28:21+5:30

जालना जिल्ह्यातील मंठा येथून लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बाजारात विक्रीसाठी जाणाºया चालत्या टेम्पोवर चढून दोन लाख रुपयांचे २१ बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार व्यापारी महंमद फारु ख महमंद सुलतान यांनी पोलिसात दिली.

The stool trader stole 21 goats | मंठ्याच्या व्यापाऱ्याचे २१ बकरे चोरले

मंठ्याच्या व्यापाऱ्याचे २१ बकरे चोरले

केज : जालना जिल्ह्यातील मंठा येथून लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील बाजारात विक्रीसाठी जाणाºया चालत्या टेम्पोवर चढून दोन लाख रुपयांचे २१ बकरे चोरट्यांनी चोरुन नेल्याची तक्रार व्यापारी महंमद फारु ख महमंद सुलतान यांनी पोलिसात दिली. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. हा टेम्पो केजहून कळंबकडे निघाला असता चिंचोली फाटा ते साळेगाव दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्याने टेम्पो धिम्या गतीने चालत होता. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चालत्या टेम्पोत चढून २१ बकरे लंपास केले. हा प्रकार चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने सदर व्यापाºयाला माहिती दिली. त्यानंतर व्यापा-याने मंगळवारी रात्री पोलिसात तक्र ार दिली.

Web Title: The stool trader stole 21 goats