परळी शहरात दोन पराभूत उमेदवारांच्या समर्थकांत दगडफेक; दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:26 IST2025-12-22T19:25:42+5:302025-12-22T19:26:08+5:30
या घटनेतील जखमींना परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परळी शहरात दोन पराभूत उमेदवारांच्या समर्थकांत दगडफेक; दोन जण जखमी
परळी : परळी येथे नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे मतदान, मतमोजणी शांततेत पार पडली. मात्र शहरातील इस्लामपुरा बंगला परिसरात नगरसेवक पदाच्या दोन पराभूत उमेदवारांच्या समर्थकांमध्ये रविवारी रात्री वादावादी होऊन ८.३० वाजता रुपांतर दगडफेकीत झाले. या घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत.
परळी शहरात सकाळ पासून नगर पालिका निवडणूकीची शांततेत मतमोजणी झाली. त्यांनतर रात्री आठ वाजेपर्यंत आप आपल्या प्रभागात विजयी झालेले नगरसेवक, समर्थक आनंद साजरा करत असतांना इस्मामपुरा भागात मात्र दोन पराभूत नगरसेवकाच्या गटात दगडफेकीची घटना घडली. या घटनेतील जखमींना परळी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, एका जखमीस पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वाराती आले जखमी रुग्णालयात हलविण्यात आहे. झालेल्या प्रकृती सध्या स्थिर दोघांची आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन, पोलीस उपनिरीक्षक दीपक राठोड, पोलीस जमादार संजय खताळ, आकाश जाधव यांच्यासह बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
उपजिल्हा रुग्णालयात रात्री दहापर्यंत गर्दी
उपजिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाहेर जखमींना भेटण्यासाठी त्यांच्या मित्र व नातेवाईकांची एकच गर्दी दिसून आली. ही गर्दी रात्री साडेदहा वाजेपर्यंत होती. मात्र पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी रात्री साडेदहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणी तक्रार आल्यांनतर गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.