गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:49+5:302021-05-25T04:36:49+5:30

... १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करा वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व कोरोनापासून बचाव ...

Sterilization campaign should be carried out in the village | गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी

...

१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करा

वडवणी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व कोरोनापासून बचाव करण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाला तत्काळ लसीकरण उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

...

मोफत बियाणे, खते वाटप करा

वडवणी : उन्हाळी मशागतीला सुरुवात झाली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली आहे. कोरोनामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खते, बियाणे मोफत व गावागावात वाटप करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

....

मंजूर पीक विमा रक्कम देण्याची मागणी

वडवणी : सन २०२० मधील हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला विमा मंजूर झाला आहे. परंतु अद्याप त्याचे वाटप विमा कंपन्यांनी केले नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. खरीप हंगामातील पेरण्या सुरू करण्यापूर्वी विमा कंपन्यांनी विमा रक्कम खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

....

वाळूचे दर वाढल्याने बांधकाम ठप्प

वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात विविध योजनांची तसेच खासगी बांधकामे सुरू आहेत. मात्र, वाळूचे दर वाढल्याने बांधकामे ठप्प झाली असल्याचे दिसत आहे. लाॅकडाऊनमध्ये वाळू वाहतुकीस परवानगी नसल्याने व चढ्या दराने वाळू विक्रीमुळे बांधकामास अडचणी निर्माण होत आहेत.

...

मास्क वापरण्याचे आवाहन

वडवणी : तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने नागरिक बिनधास्त मास्क न लावताच फिरत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. नागरिकांनी गाफील राहू नये, असे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

....

कृषी सेवा केंद्रे दिवसभर सुरू ठेवा

वडवणी : कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे कडक लाॅकडाऊन सुरू आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास काही दिवस उरलेले आहेत. शेतकरी उन्हाळी मशागती पूर्ण करून घेत आहेत. खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकरी कृषी दुकानात गर्दी करीत असतात. लाॅकडाऊन उघडताच एकदम मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते. याचा विचार करून तालुक्यातील सर्व खरेदी केंद्र व कृषी सेवा केंद्र दिवसभर सुरू ठेवावीत, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Web Title: Sterilization campaign should be carried out in the village