मदर टेरेसांचा पुतळा बीडमध्ये बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:38 IST2021-08-28T04:38:01+5:302021-08-28T04:38:01+5:30
बीड : भारतरत्न संत मदर टेरेसा यांच्या कार्याची ख्याती जगभरात होती. त्यांचे समाजकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण ...

मदर टेरेसांचा पुतळा बीडमध्ये बसविणार
बीड : भारतरत्न संत मदर टेरेसा यांच्या कार्याची ख्याती जगभरात होती. त्यांचे समाजकार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण सदैव व्हावे, यासाठी बीड शहरातील ईडन गार्डनसमोर असलेल्या चौकामध्ये मदर टेरेसा यांचा पुतळा बसविला जाईल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
बीड शहरातील धानोरा रोडवरील पोलीस मुख्यालयाशेजारी ख्रिश्चन स्मशानभूमी (पीस ईडन गार्डन) येथे भारतरत्न संत मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांना भारतरत्न संत मदर टेरेसा सेवारत्न पुरस्कार देण्यात आला.
पोलीस अधीक्षक आर. राजा रामा स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे म्हणाले, संत मदर टेरेसा यांच्या स्मरणार्थ ईडन गार्डन परिसरात गतवर्षी दोन हजार झाडे लावली होती. ती आता बहरली असून त्यामुळे या भागात पोषक वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा वन अधिकारी पाखरे, जिल्हा कृषी अधिकारी साळवे, इन्फंटचे दत्ता बारगजे, नगरसेवक नाईकवाडे, गणेश वाघमारे, राम वाघ, फादर प्रकाश भालेराव, डॅनिएल ताकवाले, रेव्ह चार्लस सोनवणे, रेव्ह जयराज शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मारियन रेड्डी, पीस ऑफ ईडन गार्डन कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मॅथ्यू जोसेफ, ब्रदर अरुण गायकवाड, प्रतीक भालतिलक, ब्रदर पीटर रेड्डी, नीलिमा रामटेके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
चौकट
कोविडयोद्धा पुरस्काराने गौरव
भारतरत्न संत मदर टेरेसा यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. रोहित तोष्णीवाल, डॉ. सचिन चोले, डॉ. राजेंद्र भोरे, डॉ. सचिन आंधळकर, अधिसेविका रमा गिरी, सहायक अधिसेविका महानोर, परिसेविका संगीता सिरसट, सिस्टर शीला मुंडे, सुरेखा लोणखसकर यांना कोविडयोद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.