कडा ते टाकळी रस्त्याबाबत तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:41 IST2021-09-16T04:41:09+5:302021-09-16T04:41:09+5:30
आष्टी : कडा-टाकळी अमिया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन ...

कडा ते टाकळी रस्त्याबाबत तहसीलदारांना निवेदन
आष्टी : कडा-टाकळी अमिया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजवावेत, अन्यथा टाकळी, शेरी खुर्द, रुईनालकोल, सराटेवडगांव, आनंदवाडी, घुमरी पिंप्री सरपंच व ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले आहे. यावेळी सरपंच सावता ससाणे, रुईनालकोल सरपंच संजय नालकोल, सराटेवडगावचे सरपंच प्रा. राम बोडखे, पिंपरीचे सरपंच देविदास पांडुळे, विष्णू निंबाळकर, अनिल गजघट, रवींद्र भूकन, गोपीनाथ बोडखे, शरद पवार, साईनाथ बोडखे, अजर शेख, भागवत गिरी, खंडू धोंडे, आजिनाथ बोडखे, जाधव प्रशांत, श्रावण पांडुळे आदी उपस्थित होते.