पीकविमाप्रश्नी किसान सभेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST2021-08-13T04:37:59+5:302021-08-13T04:37:59+5:30

माजलगाव : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा-२०२० चा खरीप पीकविमा देण्यास कंपनीस भाग पाडावे, या मागणीचे निवेदन १० ऑगस्ट ...

Statement of Kisan Sabha on crop insurance issue | पीकविमाप्रश्नी किसान सभेचे निवेदन

पीकविमाप्रश्नी किसान सभेचे निवेदन

माजलगाव : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा-२०२० चा खरीप पीकविमा देण्यास कंपनीस भाग पाडावे, या मागणीचे निवेदन १० ऑगस्ट रोजी आमदार प्रकाश सोळंके यांना अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिले.

सन २०२० खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या सर्व पिकांसाठी विक्रमी विमा संरक्षण घेतले होते. यावेळी हंगामाअखेरीस सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप विमा कंपनीने नुकसानभरपाई दिलेली नाही. तरी, ही नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

शिष्टमंडळात कॉ. पी.एस.घाडगे, कॉ. अजय बुरांडे, कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ.दत्ता डाके, कॉ.पांडुरंग राठोड, कॉ.मोहन लांब, कॉ.सय्यद बाबा, कॉ.संदीपान तेलगड, कॉ.शिवाजी कुरे, कॉ.बळीराम भुंबे यांचा समावेश होता.

110821\1945purusttam karva_img-20210811-wa0018_14.jpg

२०२० चा पिकविमा मिळावा, या मागणीचे निवदेन आमदार पकाश सोळंके यांना किसान सभेचे पदाधिकारी.

Web Title: Statement of Kisan Sabha on crop insurance issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.