एचआयव्ही संसर्गितांचा सर्वधर्मिय राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:15 AM2019-05-29T00:15:34+5:302019-05-29T00:16:58+5:30

एचआयव्ही संसर्गितांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी ३० मे रोजी तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे दुपारी बारा वाजता ‘जुळून येती रेशिम गाठी पर्व-१’ अंतर्गत एचआयव्ही संसर्गित सहा जोडप्यांचा सामूहिक राज्यस्तरीय विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या विहान प्रकल्पाचे संचालक राजन दहिवाळ यांनी दिली.

State-level group marriage ceremony for HIV infected people | एचआयव्ही संसर्गितांचा सर्वधर्मिय राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळा

एचआयव्ही संसर्गितांचा सर्वधर्मिय राज्यस्तरीय सामूहिक विवाह सोहळा

googlenewsNext

बीड : एचआयव्ही संसर्गितांना समाजात सन्मानाने वागणूक मिळावी यासाठी ३० मे रोजी तालुक्यातील श्रीक्षेत्र कपिलधार येथे दुपारी बारा वाजता ‘जुळून येती रेशिम गाठी पर्व-१’ अंतर्गत एचआयव्ही संसर्गित सहा जोडप्यांचा सामूहिक राज्यस्तरीय विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती एचआयव्हीसाठी काम करणाऱ्या विहान प्रकल्पाचे संचालक राजन दहिवाळ यांनी दिली.
हेल्थ केअर कम्युनिटी आॅफ पॉझीटिव्ह पीपल्स अंतर्गत बीड व अंबाजोगाई येथे विहान हे काळजी व आधार केंद्र कार्यरत आहे. विहान एचआयव्ही संसर्गितांसाठी काम करते. १९ वर्षांपासून या केंद्राद्वारे समुपदेशन करणे, संदर्भसेवा, मोफ त रक्त उपलब्ध करु न देणे, शासनाच्या तसेच निमशासकीय योजनांचा लाभ एचआयव्ही संसर्गितांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. समाजाचा एचआयव्ही संसर्गितांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा, एडसच्या प्रसाराला प्रतिबंध लागावा म्हणून महिनाभरापूर्वी विहानच्या माध्यमातून एचआयव्ही संसिर्गतांचा राज्यस्तरीय वधू वर-परिचय मेळावा घेण्यात आला. देशभरातून वधू-वर आपल्या पालकांसह सहभागी झाले होते. परिचय मेळाव्यातून सहा जोडप्यांच्या रेशीम गाठी जुळून आल्या. त्यांचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा ३० मे रोजी क्षीक्षेत्र कपिलधार येथे दुपारी बारा वाजता होणार आहे. कार्यक्रमास प्रशासनातील अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
दानशुरांच्या बळावर आयोजन
विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, दानशुरांच्या मदतीच्या बळावर एचआयव्ही संसर्गित जोडपे विवाह बंधनात अडकणार आहेत. हा सोहळा म्हणजे घरचे कार्य आहे असे समजून उपस्थित रहावे, असे आवाहन विहान प्रकल्प समन्वयक प्रियंका खोब्रागडे यांनी केले.
आजपर्यंत एचआयव्ही संसर्गितांचे विवाह झाले. परंतु श्रीक्षेत्र कपिलधार येथे होणारा सर्वधर्मिय राज्यस्तरीय सामुदायिक विवाह सोहळा हा भारतातील पहिला सामुदायिक सोहळा असल्याची माहिती विहानचे प्रकल्प संचालक राजन दहिवाळ यांनी दिली.

Web Title: State-level group marriage ceremony for HIV infected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.