भूमिहीन सन्मान योजना सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:56+5:302021-06-25T04:23:56+5:30
बनसारोळा : शासनाने शेतमजुरांसाठी भूमिहीन सन्मान योजना सुरू करावी. कोरोना महामारीच्या काळात या मजुरांना आधार म्हणून प्रत्येकी दहा हजार ...

भूमिहीन सन्मान योजना सुरू करा
बनसारोळा : शासनाने शेतमजुरांसाठी भूमिहीन सन्मान योजना सुरू करावी. कोरोना महामारीच्या काळात या मजुरांना आधार म्हणून प्रत्येकी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय मुजमुले यांनी एका निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत २१ जून रोजी केज तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
सततची नापिकी, दुष्काळ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याच शेतीवर मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या भूमिहीन लाखो शेती कामगारांना सध्या रोजगार मिळत नाही. काही अर्धपोटी तर काही उपाशीपोटी जीवन जगत आहेत. शेतकऱ्यांना केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना सुरू करून दिलासा दिला आहे. परंतु त्याच शेतीवर आधारित आपली उपजीविका भागवणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांचे काय? त्यांच्यासाठी काय? उपाययोजना आहेत का? असा सवालही त्यांनी निवेदनाव्दारे केला आहे.
निवेदनावर स. का. पाटेकर, रणजित घाडगे, राजकुमार धिवार, नवनाथ पौळ, सचिन बचुटे, बाळासाहेब खाडे, बाळासाहेब जाधव, सोनबा राऊत, अशोक बोबडे यांच्या सह्या आहेत.