शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

उद्ध्वस्त रानातली पिके पाहिली पथकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:28 IST

केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाची पाहणी। शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा घेतला आढावा, केंद्राला अहवाल देणार

बीड : केंद्रीय कृषि विभागाच्या पाहणी पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील जवळपास १५ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतक-यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने खरीप हंगामातील पीक हातचे गेले. त्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करु न केंद्र शासनाला अहवाल सादर करण्यासाठी हे पथक आले होते. उद्ध्वस्त रान, नुकसान झालेल्या बाजरी, सोयाबीनचे ढिगारे, अजूनही शेतात साचलेले पाणी आणि उजाड फळबागा या पथकाने प्रातिनिधीक स्वरुपात पाहिल्या. इतर शेतकºयांचेही असेच नुकसान झाल्याचे संवाद करताना शेतकरी सांगत होते.आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव व्ही. थिरुप्पूगाझ व सदस्य डॉ. के. मनोहरन् यांच्या पथकासमवेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, विभागीय सहसंचालक (कृषी) एस के दिवेकर, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, आ. लक्ष्मण पवार आदि उपस्थित होते.गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथे केंद्रीय पथकाने विलास कोटांबे यांच्या बाजरी पिकाची पाहणी करुन संवाद साधला. रांजणी येथे कुंडलिक जाधव यांच्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. याच तालुक्यातील जळगाव मांजरा येथे दामोदर इजगे यांच्या शेतात कापूस पिकांची तसेच वाहेगाव आमला येथे अरु णा चव्हाण यांच्या शेतात पाहणी केली.यानंतर पथकाने माजलगाव येथे शिवाजीराव रांजवण यांच्या डाळिंब फळबागाची, तर प्रणिता रेवणवार यांच्या सोयाबीनची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर, तहसीलदार प्रतिभा गोरे आदी उपस्थित होत्या. लहामेवाडी येथे अल्लाउद्दीन खाजामिया यांच्या शेतात पाहणी करुन धारुर तालुक्यातील तेलगाव येथे उत्तमलाल कासलीवाल यांच्या शेतात सोयाबीन पीक पाहणी व संवाद केला. यावेळी तहसीलदार व्ही. एस. शेडोळकर उपस्थित होते. त्यानंतर पथकाने वडवणी तालुक्यातील पुसरा येथे सोनाबाई वाव्हळ यांच्या बाजरी पिकांची तसेच मोरवड येथे माऊली शेळके यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी उपस्थित होत्या. तसेच बीड तालुक्यातील घाटसावळी येथे महादेव लांडे यांच्या बाजरी पिकाची तर जरुड येथे बाबासाहेब कोरडे यांच्या शेतातील कपाशी पिकांची पाहणी केली.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊसFarmerशेतकरी