बीड येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:49 IST2019-08-20T23:49:03+5:302019-08-20T23:49:50+5:30
शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत्या घरामध्ये गळफास घेवून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

बीड येथे गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या
बीड : शहरातील लक्ष्मीनगर भागात राहत्या घरामध्ये गळफास घेवून एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
भाग्यश्री उर्फ सोनी राम गायकवाड (वय २५ रा.लक्ष्मीनगर ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. भाग्यश्री बीड तालुक्यातील नाळवंडी येथे माहेरी रक्षाबंधनासाठी गेली होती. सोमवारी माहेराहून सासरी परत आली होती. दरम्यान तिचा पती २ दिवसापासून कामानिमित्त पुणे येथे गेल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.घरामध्ये भाग्यश्री, तिचा तीन वर्षाचा मुलगा व सासू या दोघीच घरी होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिने घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. नेमके आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे मात्र समजू शकले नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरु होती.