धारूरमध्ये रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:38 IST2021-08-12T04:38:02+5:302021-08-12T04:38:02+5:30
धारूर : आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव हा गेल्या वर्षीपासून कृषी विभाग, आत्मा यांच्यामार्फत साजरा केला जात आहे. ...

धारूरमध्ये रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
धारूर : आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव हा गेल्या वर्षीपासून कृषी विभाग, आत्मा यांच्यामार्फत साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने सोमवारी धारूर तालुक्यात रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला.
रानभाजी महोत्सवानिमित्त विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये पंचायत समिती सभापती चंद्रकला नागरगोजे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुनील शिनगारे, तहसीलदार वंदना शिडोळकर, तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे, मंडळ कृषी अधिकारी समाधान वाघमोडे, मंडळ कृषी अधिकारी चेतन कांबळे,उपस्थित होते. रानभाजी महोत्सवाचे शुभारंभ तहसीलदार वंदना शिडोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी प्रस्ताविक केले. रानभाजी महोत्सव घेण्यामागचे उद्दिष्ट सांगितले. मान्यवरांनी रानभाजीबद्दल महत्त्व आणि फायदे सांगितले. रानभाज्या संकलित करून त्या कशाप्रकारे बनवतात. व त्या आरोग्यासाठी कशा महत्त्व पूर्ण आहेत, या विषयी सविता बोबडे, पूजा कागने यांनी माहिती दिली. केले.
रानभाज्या मध्ये पथरी, गुळवेल, केणा, टाकला, दिंदा, कुडा, पानाचा ओवा, कपाळ फोडी, भुई आवली, मायाळू, शेवगा, कवट, सीताफळ, अशा विविध ३० प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी केले. बिपीन डरफे यांनी आभार मानले. कार्यक्रमास धारूर शहरातील नागरिक व परिसरातील शेतकरी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
100821\10bed_3_10082021_14.jpg~100821\10bed_2_10082021_14.jpg
धारूर कृषी कार्यालयात आयोजीत रानभाजी मोहत्सव~कृषी विभागात आयोजीत रानभाजी मोहत्सव उस्फूर्त प्रतीसाद