शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

भरधाव टेंपो उभ्या पिकअपवर धडकला;दोन्ही वाहनांच्यामध्ये चिरडून चालकाचा मृत्यू, १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 13:30 IST

अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीजवळ झाला अपघात

अंबाजोगाई - भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज शनिवारी पहाटे (दि.१९) दिड वाजताच्या सुमारास झाला. अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत

आजनी बु. येथील ठाकूर कुटुंबीय अन्य नातेवाईकांसह वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी पिकअप वाहनातून (एमएच २४ एबी ६६२४) अहमदनगरला निघाले होते. वाटेत बर्दापूरच्या पुढे आल्यानंतर नंदगोपाल डेअरीजवळ ते सर्वजण पिकअप रस्त्याच्या बाजूला लावून उतरले. थोड्यावेळाने सर्वांना वाहनात बसवून पिकअप चालक ज्ञानेश्वर पांडुरंग ठाकूर (वय ४२) हे मागील बाजूचा फालका लावत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेंपोने पिकअपला जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही वाहनाच्या मध्ये चिरडून ज्ञानेश्वर ठाकूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिकअप मधील उर्मिला उद्धव ठाकूर (४०), खंडू बळीराम खाणशेट्टी (४५), मुकेश उद्धव ठाकूर (१२), दैवाशाला ठाकूर (४०), रुख्मिनबाई नामदेव ठाकूर (६०), रुपाली गोविंद ठाकूर (११), रेणुका गोविंद ठाकूर (३९), कलावती बाजी येरांडे (४८), रावसाहेब शिंदे (४४), गजानन बालाजी शिंदे (२७), गंगाधर रामा कोरे (७०), अजय माधव शिंदे (१२), बालाजी मुक्ताराम ठाकूर (३७), कमलबाई ठाकूर (६०), ओंकार ज्ञानेश्वर ठाकूर (१५), मेघा ज्ञानेश्वर ठाकूर (३८), मनुबाई गणशेट्टी (७०), विष्णू ज्ञानेश्वर ठाकूर (१२) सर्व रा. आजनी बु. आणि अर्चना माधव शिंदे (३५, रा. घनसावरगाव) हे जखमी झाले. सध्या १२ जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून एकास लातूरला हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना मदत केली. दरम्यान, अपघातानंतर टेंपोचालकाने घटनास्थळाहून टेंपोसह पळ काढला. 

अपघात आणि मृत्यूंची नियमित मालिकाअंबाजोगाई लातूर रोडवर बर्दापूर ते सायगाव दरम्यान अपघातांची मालिका अखंडपणे सुरुच आहे. राष्ट्रीय महामार्ग अरुंद असल्याने या भागात सतत अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. रस्ता रुंदीकरण करण्याची तीव्र आवश्यकता आहे. किमान तोपर्यंत या भागात ठिकठिकाणी ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असे फलक तरी लावावेत जेणेकरून वाहनचालक अधिक सावधतेने वाहन चालवतील आणि अपघातांवर काही प्रमाणात का होईना नियंत्रण येईल.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडAccidentअपघात