केज येथे समाजसेविकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST2021-06-09T04:42:14+5:302021-06-09T04:42:14+5:30

या तरुणीस दोघांनी ७ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान दोन आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून फोन करून, ...

Social worker molested at Cage | केज येथे समाजसेविकेचा विनयभंग

केज येथे समाजसेविकेचा विनयभंग

या तरुणीस दोघांनी ७ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान दोन आरोपींनी वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून फोन करून, ‘तू मला आवडतेस. तू आमच्यासोबत लग्न कर,’ असे म्हणून एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर, ती तरुणी बोलावलेल्या ठिकाणी मुद्धाम गेली असता, तू आमच्यासोबत फिरायला चल, अन्यथा जीवे मारून टाकू, अशी धमकी देत तिचा विनयभंग केला.

घटनेनंतर त्या पीडित महिलेने केज पोलीस ठाणे गाठून त्या दोन तरुणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्या तक्रारीवरून धनंजय भीमराव गालफाडे व एक अनोळखी इसम या दोघांविरुद्ध विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिली, या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Social worker molested at Cage