कोविड ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार, चहा, पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:48+5:302021-05-24T04:31:48+5:30

चेक पोस्ट तसेच विविध चौकात कर्तव्यावर असणारे पाेलीस,शिक्षक, कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाण पाण्याची तसेच खाण्याची सोय नसते. काही वेळा ...

Snacks, tea, water to the employees on covid duty | कोविड ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार, चहा, पाणी

कोविड ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांना अल्पोपाहार, चहा, पाणी

चेक पोस्ट तसेच विविध चौकात कर्तव्यावर असणारे पाेलीस,शिक्षक, कर्मचाऱ्यांना अनेक ठिकाण पाण्याची तसेच खाण्याची सोय नसते. काही वेळा उपाशी पोटी राहून आपले कर्तव्य बजावावे लागते. ही बाब लक्षात घेत येथील आधार माणुसकीच्या ग्रुपच्या वतीने शहागड, गेवराई शहराजवळचे चेक पोस्टी तसेच विविध चौकांत आपले कर्तव्य

बजावणाऱ्या पोलीस, शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, होमगार्ड यांना दोन वेळचा चहा, नाष्टा यात पोहे, तर कधी उपमा तसेच पाण्याची बाटली दिली जात आहे. आधार माणुसकीचा ग्रुपचे रंजित पवार, किरण बेदरे, संदीप बेदरे, आकाश टोनपे आदी सकाळी व संध्याकाळी जिथे कर्तव्यावर अधिकारी व कर्मचारी असतील तेथे चहा, नाष्टा, पाण्याची सोय करत आहेत.

===Photopath===

230521\23bed_7_23052021_14.jpg

Web Title: Snacks, tea, water to the employees on covid duty