बनावट दारूप्रकरणी सहा जणांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:40+5:302021-04-09T04:35:40+5:30

बीड : बुधवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील ...

Six arrested in fake liquor case | बनावट दारूप्रकरणी सहा जणांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

बनावट दारूप्रकरणी सहा जणांना अटक, मुख्य सूत्रधार फरार

Next

बीड : बुधवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने पिंपळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील नागापूर शिवारातील एका बंद अवस्थेतील जिनिंग मिलमध्ये छापा टाकून बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश केला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार फरार असल्याचे सांगण्यात आले.

विभागाने ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी तेथे राजू किसन चव्हाण, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड , ऋषिकेष राजू चव्हाण, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, रविंद्र किसन चव्हाण, रा. जुना मोंढा, ता. जि. बीड, आकाश वेताळ लोकरे, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, विक्की वेताळ लोकरे, रा. नवनाथ नगर, ता. जि.बीड, निखिल कचरु घुले, रा. पांडुरंग नगर, ता. जि. बीड हे स्पिरीटपासून बनावट देशी दारू तयार करून त्याची बॉटलिंग करताना आढळून आल्याने त्यांना जागीच अटक करण्यात आली यातील मुख्य सूत्रधार रोहित चव्हाण हा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

दोन्ही घटनास्थळावरुन १८० मिली क्षमतेच्या बनावट देशी मद्याने भरलेल्या १७७६ सीलबंद बाटल्या व ९० मिली क्षमतेच्या बनावट देशी मद्याने भरलेल्या २०० सीलबंद बाटल्याचा साठाही विभागाने ताब्यात घेतला. तर ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीकडून बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट, बनावट लेबल्स, बुचे इत्यादी कुठून पुरवठा होत आहे याबाबत विभागाकडून सखोल तपास करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप व विभागीय उपायुक्त औरंगाबाद पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,बीड नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक डि. एल. दिंडकर निरीक्षक, परिविक्षाधीन उपअधीक्षक इंगळे,जालना येथील निरीक्षक शहाजी शिंदे, दुय्यम निरीक्षक पडुळ, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक प्रविण ठाकूर, दुय्यम निरीक्षक गायकवाड, शेळके, घोरपडे, राठोड, वाघमारे व सर्व जवान कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

फोटो ओळी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड, जालना व औरंगाबादच्या विभागीय भरारी पथकाने बनावट देशी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश केला.

===Photopath===

080421\082_bed_15_08042021_14.jpg

===Caption===

बनावट दारू कारखान्यावर धाड टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. 

Web Title: Six arrested in fake liquor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.