उद्योग, रोजगार निर्मितीसाठी माजलगावात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:12+5:302021-06-27T04:22:12+5:30
माजलगाव : येथील सावरगाव मुख्य हायवेलगत एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी शासनाने जमीन अधिग्रहण केलेली आहे. या ठिकाणी अद्याप एकही ...

उद्योग, रोजगार निर्मितीसाठी माजलगावात ठिय्या आंदोलन
माजलगाव : येथील सावरगाव मुख्य हायवेलगत एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी शासनाने जमीन अधिग्रहण केलेली आहे. या ठिकाणी अद्याप एकही उद्योग चालू नाही. युवकांना रोजगारासाठी एमआयडीसी तत्काळ चालू करावी या मागणीसाठी लढा मानव मुक्ती, योद्धा प्रतिष्ठान, भीमक्रांती मंडळ, युवा बेरोजगार विद्यार्थी मोर्चा आणि गावातील युवा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी सामाजिक न्याय दिनी माजलगाव एमआयडीसी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
माजलगाव तालुक्याला धरणाच्या पाण्याची देणगी आहे. हे पाणी बीड, परळीला जाते. याच पाण्याची एमआयडीसीला मदत होऊ शकते. तसेच या भागात उद्योग व रोजगार निर्मिती व्हावी म्हणून एमआयडीसीसाठी निधीची तरतूद झाली. सावरगाव मुख्य हायवेलगत एम.आय.डी.सी. उभारण्यासाठी शासनाने जमीन अधिग्रहण केली. परंतु, येथे फक्त विजेचे खांब, रोड व पाण्याची टाकी आदी वास्तू गेली दहा वर्षे झाली उभ्या दिसतात. पण प्रत्यक्षात एकही उद्योग चालू झालेला नाही. त्यामुळे माजलगावची एमआयडीसी नावालाच असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांचे जगणे संकटात आले आहे. रोजगार बंद पडून हातची काम गेली आहेत. दुसरीकडे महागाईने कंबरडे मोडले आहे. चोऱ्या व गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा शासनाने गांभीर्याने विचार करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी एमआयडीसी चालू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठिय्या आंदोलनात युवक मोठ्या संख्येने सहभागी होते. या संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास जलसमाधी, रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा लढा मानव मुक्तीचे सचिन उजगरे तसेच भारतीय युवा मोर्चाचे अनिल साळवे, रमेश जाधव, सुशील बोराडे, सुरेश फुलवरे, लिंबाजी सोनपसारे, दयानंद साळवे, धम्मानंद सोनकांबळे, शिवाजी ससाने, सिद्धार्थ पौळ, सुभाष बोराडे, संजय कांबळे, मच्छिंद्र उफाडे, आदींनी दिला.
===Photopath===
260621\purusttam karva_img-20210626-wa0084_14.jpg