लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:14 IST2019-11-09T19:13:35+5:302019-11-09T19:14:11+5:30
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील घटना

लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू
कडा : शेतात गेलेली दोन भावंडे तोल जाऊन लिंबोडी तलावात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी ५.३० वाजेच्या दरम्यान घडली. संकेत आघाव (८) व महेश आंधळे (९ ) असे मृत मुलांची नावे असून ते आते-मामे भाऊ होते.
आष्टी तालुक्यातील खिळद येथील संकेत बापु आघाव हा आईसोबत भाऊबीजनिमित्त मामाच्या गावी लिंबोडी येथे आला होता. शनिवारी सायंकाळी संकेत त्याच्या मामाचा मुलगा महेश सतिश आंधळे सोबत शेतात गेले होते. शेतालगत असलेल्या लिंबोडी तलावाजवळून जात असताना दोघेही तोल जाऊन पडले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला.