प्रभू रामाने केंद्र अन् राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 03:30 PM2024-01-01T15:30:10+5:302024-01-01T15:45:10+5:30

मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषीकेश बेद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते.

Shri Ram give wisdom to central and state governments to give reservation; Manoj Jarange Patil statement | प्रभू रामाने केंद्र अन् राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगेंचं विधान

प्रभू रामाने केंद्र अन् राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी; मनोज जरांगेंचं विधान

प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावे. असे साकडे प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घातले आहे. 

मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषीकेश बेद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच आजच्या नवीन वर्षाचा संकल्प असेल. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे आहे, असे आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. पुढे बोलताना त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना उत्तर दिले आहे. 

जरांगे पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल. आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे. आता पुरावे देखील सापडले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे जरांगे पाटील यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बीडमध्ये होत असलेल्या ओबीसींच्या सभेबाबत छगन भुजबळ यांच्या बाबत काय बोलावे? ते कामातून गेलेले आहेत. लोकशाहीत ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे, असे भुजबळांच्या होणाऱ्या सभेवरून जरांगे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Shri Ram give wisdom to central and state governments to give reservation; Manoj Jarange Patil statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.