श्रीकृष्ण-बलराम रथयात्रेने शहरवासियांमध्ये चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:27 IST2020-02-02T00:26:40+5:302020-02-02T00:27:09+5:30

येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते.

Shri Krishna-Balaram Rath Yatra enlightens the city dwellers | श्रीकृष्ण-बलराम रथयात्रेने शहरवासियांमध्ये चैतन्य

श्रीकृष्ण-बलराम रथयात्रेने शहरवासियांमध्ये चैतन्य

ठळक मुद्देइस्कॉनच्या राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण

बीड : येथील सावता माळी चौक परिसरातील इस्कॉनच्या श्री श्री राधागोविंद मंदिराला १७ वर्षे पूर्ण झाल्याने शनिवारी श्रीकृष्ण बलराम रथयात्रेचे शहरात आयोजन करण्यात आले होते.
मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा निघाली. यात शेकडो भाविकांचा सहभाग होता. श्रीकृष्ण-बलराम यांची उत्सवमूर्ती ठेवलेला रथ फुलांनी सुशोभित होता. महिला-भगिनींनी डोईवर तुळस घेतली होती. शेकडो भाविक सहभागी झाले होते. रथयात्रा मंदिरात पोहोचल्यानंतर महाआरती, छप्पन्नभोग कार्यक्रम झाले.
दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत भजन, अभिषेक, पुष्पाभिषेक, प्रवचन, छप्पन्नभोग, महाआरती आणि महाप्रसाद होणार आहे.

Web Title: Shri Krishna-Balaram Rath Yatra enlightens the city dwellers