गैरहजर असलेल्या ८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:39 IST2021-09-15T04:39:39+5:302021-09-15T04:39:39+5:30

बीड : जिल्हास्तरीय लोकशाही दिन बैठकीला गैरहजर राहणाऱ्या विविध विभागाच्या आठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कारणे दाखवा ...

Show cause notice to 8 absent officers | गैरहजर असलेल्या ८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गैरहजर असलेल्या ८ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

बीड : जिल्हास्तरीय लोकशाही दिन बैठकीला गैरहजर राहणाऱ्या विविध विभागाच्या आठ अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे एकाच ठिकाणी निरसन व्हावे यासाठी लोकशाही दिन आयोजित केला जातो. या ठिकाणी सर्व विभागाचे जबाबदार अधिकारी उपस्थित राहावेत यासाठी लोकशाही दिनाच्या दिवशी इतर कोणत्या बैठक, दौऱ्यांचे आयोजन करू नये अशा सूचनादेखील दिल्या जातात. मात्र तरी, देखील सोमवार ६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या लोकशाही दिनाला जिल्ह्यातील अनेक अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे आता बीडचे जिल्हाधिकारी शर्मा यांनी लोकशाही दिनाला अनुपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लोकशाही दिन अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावा आणि त्या दिवशी इतर बैठका किंवा दौरे टाळावेत असे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या विभागांच्या अधिकाऱ्यांना नोटीस

कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प टप्पा ३, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी, कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग बीड, कार्यकारी अभियंता बीड पाटबंधारे विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड, जिल्हा कृषी विकास अधिकारी, बीड उपविभागीय अधिकारी बीड,

Web Title: Show cause notice to 8 absent officers