शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. ...

अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रस्त्याची उंची कमी झाली आहे. तसेच त्या बाजूने उतार झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठे अडथळे येत आहेत. दुचाकी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खराब झालेला हा सर्व्हिस रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.

-----------

व्हॉल्व्हला गळती

अंबाजोगाई : शहरात अनेक ठिकाणी व्हॉल्व्हला गळती लागली आहे. ज्यावेळेस पाणी सोडण्यात येते. त्यावेळी या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. एकीकडे नगर परिषद प्रशासन पाणी बचतीचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही गळती काढण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना करूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे.

-----------

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यातही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.

------------

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

अंबाजोगाई : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढत आहे.

--------

प्लास्टिकमुळे शेतीच्या सुपीकतेला धोका

अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते; परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

------------

रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.