दुकान फोडून चार लाखांची पितळी भांड्याची मोड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:23+5:302021-03-10T04:33:23+5:30
बीड : बार्शी रोडवर असलेल्या एका भांड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. आतील पितळी ...

दुकान फोडून चार लाखांची पितळी भांड्याची मोड लंपास
बीड : बार्शी रोडवर असलेल्या एका भांड्याच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत मध्ये प्रवेश केला. आतील पितळी भांडे चोरून नेले, या भाड्यांची किमंत अंदाजे चार लाख रुपयांपर्यंत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली. चोरट्यांने माल नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनाचा वापर केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच, शिवाजीनगर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. ज्ञानेश्वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर साई स्टील स्क्रॅप नावाचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान चोरट्याने या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दुकानात पितळी भांड्याची मोड मोठ्या प्रमाणात होती. जवळपास ८ ते ९ पोत्यामध्ये पितळी मोड ठेवण्यात आली होती. ही सर्व पितळी मोड चोरट्याने लंपास केली. मोड नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनांचा उपयोग केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी सकाळी जवकर यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. त्यानुसार ठाण्याचे पोलीस कर्मचारी तुषार गायकवाड, पठाण, शेख मोहसीन यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गस्त वाढवण्याची मागणी
मागील काही दिवसापांसून शहरात मध्यरात्रीच्या वेळी होणाऱ्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने दुचाकीवर (चार्ली) पेट्रोलींग केली जाते. मात्र, वाढत्या घटना पाहता तसेच बीड शहरात गस्त वाढवावी, जेणेकरून मुख्य रहदारी असलेल्या रस्त्यावर चोऱ्या होणार नाहीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.