धक्कादायक; दोन वेळा अहवाल अनिर्णीत राहिलेल्या व्यक्तीचा बीडच्या कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 03:47 PM2020-06-08T15:47:27+5:302020-06-08T15:48:35+5:30

आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील एक कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून गावी आले होते.

Shocking; Twice reported inconclusive; man dies in Beed's Corona ward | धक्कादायक; दोन वेळा अहवाल अनिर्णीत राहिलेल्या व्यक्तीचा बीडच्या कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

धक्कादायक; दोन वेळा अहवाल अनिर्णीत राहिलेल्या व्यक्तीचा बीडच्या कोरोना वॉर्डमध्ये मृत्यू

Next

- सोमनाथ खताळ

बीड : मुंबईहून आलेल्या एका ३२ वर्षीय व्यक्तीचा दोन वेळा स्वॅब घेतला. त्यात दोन्ही वेळा त्याचा अहवाल अनिर्णीत राहिला. रविवारी रात्री तिसऱ्यांदा स्वॅब घेतल्यानंतर सोमवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आता त्याचा अहवाल काय येतो, याकडे लक्ष लागले आहे. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील एक कुटूंब ३१ मे रोजी मुंबईहून गावी आले होते. या कुटूंबाचा एका पॉझिटिव्ह रुग्णासोबत संपर्क आला होता. गावी येताच आरोग्य विभागाने पती-पत्नी व दोन मुलांना जिल्हा रुग्णालयात आणून स्वॅब घेतला. यात पुरुषाचा अहवाला अनिर्णीत तर इतर तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे पुन्हा ४८ तासांनी त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला त्याचा अहवाल देखील अनिर्णीत आला. रविवारी रात्रीही त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला. परंतू, पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. आता त्याच्या स्वॅबचा अहवाल रात्री उशिरापर्यंत येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मृत्यूच्या घटनेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दुजोरा दिला आहे. 

आज २३ अहवालांची प्रतिक्षा
आज जिल्ह्यातून २३ स्वॅब घेण्यात आले. यात बीडमधील १०, अंबाजोगाई ३, परळी ६ आणि गेवराईमधील ४ स्वॅबचा समावेश आहे. या सर्वांचा अहवाल रात्री उशिरा येईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Shocking; Twice reported inconclusive; man dies in Beed's Corona ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.