Shocking; One dies in isolation ward after taking swab in Beed | धक्कादायक; बीडमध्ये स्वॅब घेतल्यावर एकाचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू

धक्कादायक; बीडमध्ये स्वॅब घेतल्यावर एकाचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू

बीड : ह्रदयाचा आणि लिव्हरचा आजार असलेला एका व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला आयसोलेशन वार्डमध्ये दाखलही केले. रात्री स्वॅब घेतल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाला. आता अहवालाची प्रतिक्षा आहे. आरोग्य विभागाकडून याला दुजोरा मिळाला आहे.

बीड शहरातील एक ४६ वर्षीय व्यक्तीला विविध आजार आहेत. मंगळवारी सकाळी तो व्यक्ती जिल्हा रुग्णलयात आला. त्याला प्रवासाचा इतिहास नसला तरी संशयित म्हणून त्याला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. रात्री त्याचा स्वॅबही घेतला. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला लिव्हर व ह्रदयाचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला प्रवासाची कसलाही इतिहास नसल्याचेही सूत्रांकडून समजते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात म्हणाले, त्या व्यक्तीचा स्वॅब घेतला आहे. रात्री उशिरा अहवाल प्राप्त होईल. 

आज ६६ स्वॅब प्रयोगशाळेत
बुधवारी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थेतून कोरोना संशयित असलेल्या ६६ लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे.

Web Title: Shocking; One dies in isolation ward after taking swab in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.