शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रात खळबळ! कर्जफेडीसाठी तगादा वाढला, व्यथित मुख्याध्यापकाने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:00 IST

क्रेडीट सोसायटीच्या वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता.

किल्लेधारूर (बीड): पतसंस्थेकडून कर्जफेडीसाठी तगादा वाढल्याने व्यथित झालेल्या बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने आसरडोह येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन लक्ष्मण पाटोळे (34, रा. आसरडोह ) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. पाटोळे यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

धारूर तालूक्यातील आसरडोह येथील नितीन लक्ष्मण पाटूळे हे बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २०१९ साली मंगलनाथ मल्टीस्टेट को. ऑ. क्रेडीट सोसायटीकडून कर्ज घेतले होते. काही दिवसांपासून कर्जाच्या परतफेडीसाठी तगादा वाढला होता. यामुळे पाटूळे व्यथित होते. यातूनच त्यांनी आज सकाळी आसरडोह येथील तलावा शेजारील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच धारूर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ सचिन सिध्देश्वर हे  घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. 

कर्जाचा तगादा वाढल्याने उचलले टोकाचे पाऊल मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून 2019 साली वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र, कोरोना काळात काही हप्ते थकले. त्यानंतर जून 2022 रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते. परतू, मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता. त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते. यामुळे पाटोळे व्यथित होते. यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे जामीनदार, सहकारी शिक्षक रावसाहेब तिडके यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी