शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:58 AM2019-07-29T00:58:31+5:302019-07-29T00:58:44+5:30

वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे

Shock! Even if you spend 2 lakh rupees, you are in danger | शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे. त्यामुळे महावितरणनकडून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम केले जात असल्याचे समोर येत आहे. पाच तालुक्यांतील खर्चाचा आकडा ऐकून आणि सुविधांचा अभाव पाहता सर्वसामान्यांनाही ‘शॉक’ बसला आहे.
महावितरणकडून वर्षभर दुरूस्तीची कामे केली जातात. बीड विभागांतर्गत बीड शहरासह बीड ग्रामीण, आष्टी, पाटोदा, शिरूर व गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यांत मागील वर्षभरात वाकलेले खांब, पडलेले खांब दुरूस्त करणे, लोंबकाळलेल्या तारा ताणने, रोहित्र संचासह वितरण पेटीची देखभाल करण्यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही बीड शहरासह पाच तालुक्यांमधील खंडित वीज पुरवठा होण्याची परंपरा कायमच आहे. तसेच वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा जैसे थे दिसून येतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावरही खर्च केला जातो. असे असले तरी थोडेही वादळ आले किंवा पाऊस आला की तासनतास वीज पुरवठा खंडित होता. याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
प्रामाणिक ग्राहकांनी बीले भरूनही सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.
गुत्तेदारांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटे
ज्या गुत्तेदारांना दुरूस्तीसह इतर कामे दिले आहेत, त्यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. कामाच्या एकुण रकमेच्या तुलनेत ५ ते १५ टक्के रक्कम काही अधिकारी घेत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच दुरूस्तीचे कामे निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.
वादळ नसताना अन् वीजपुरवठा सुरू असताना तुटली तार
साधारण पंधरा दिवसांपूर्वी सहयोगनगर भागातील स्टेडियमकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू असताना अचानक तार तुटून पडली. हा रस्ता तसा वर्दळीचा. सुदैवाने परिसरातील लोकांनी पाहिल्याने रस्ता अडविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हाच प्रकार जर रात्रीच्या सुमारास झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतरही महावितरण शहरातील तारा दुरूस्ती व तार ताणण्याबाबत जागरूक झाले नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Shock! Even if you spend 2 lakh rupees, you are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.